वळण बंधारा

ज्या पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे डिसेंबर अखेरपर्यत ओढयाला पाणी टिकते व सर्वसाधारणपणे 150 लि. प्रतिसेकंद पाणी वहाते अशा नाल्यावर 1 मी. उंचीचे सिमेंटचे पक्के बांध घालून हे पाणी समपातळीमध्ये बाजूच्या शेतात वळविले जाते. भातखाचरांना सतत पाणी लागत असल्यामुळे नाल्याचे पाणी ढाळाने भातखाचरात वाहून नेण्यासाठी चराचा अवलंब केला जातो. ज्या नाल्याला वरील पाणलोट क्षेत्रांत फारच कमी पाऊस पडतो व तो नाला फक्त पावसाळयांत वाहतो व इतर वेळेस कोरडा पडतो या ठिकाणी या उपचाराने प्रवाही सिंचनाखाली क्षेत्र आणता येते. ही कामे 1990-91 वर्षात सुरु करण्यात आली.