1. क्रांती दिनाच्या स्वर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्ताने थोर स्वातंत्र्यसेनानी कै.डॉ.अच्युतराव पटवर्धन यांच्या सुचनेनुसार व मा.अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शनाखाली राळेगणसिध्दीचे धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक गाव स्वयंपूर्ण करण्याच्या संकल्पनासह सन 1992 मध्ये आदर्शगांव विकास योजना सुरु झाली. ग्रामीण विकासासाठी राज्य शासनामार्फत ग्रामपातळीवर राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये योग्य तो समन्वय, स्थानिक जनतेचे सहकार्य मिळाल्यास ग्रामविकास चांगल्या पध्दतीने होते हे शासनाच्या लक्षात आल्याने स्थानिक जनतेचा प्रतिसाद तसेच स्वयंसेवी संस्थेचा सहभाग केंद्रस्थानी गावाचा विकास हे आदर्शगाव योजनेचे ठळक वैशिष्टये आहे.
  2. गाभा व बिगर गाभा क्षेत्राचा विकास व चराई बंदी, कु-हाड बंदी, नसबंदी, नशाबंदी, निर्मलग्राम (लोटाबंदी) व श्रमदान या सप्तसुत्रीचे पालन गावाने व ग्रामसभेने निवडलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करणे.
  3. मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची कामे गाभा क्षेत्र विकासाचे काम म्हणून संबेाधण्यात येते. यामध्ये मृदसंधारण , सामाजिक वनीरकण, वनखाते व लघुपाटबंधारे या विभागाचे कामाचा समावेश आहे. सन 2021-22 मध्ये नोव्हेंबर 2021 अखेर 107 गावे निवडण्यात आले असून 65 गावें बर्हिगमन टप्प्यात आहेत व 42 गावे सक्रीय आहेत.
  4. बिगर गाभा क्षेत्रातील कामे संबंधित विभागाने त्यांचे मंजूर अनुदानातून प्राधान्याने पूर्ण करावीत असे अभिप्रेत आहे.
  5. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्रं. आगायो 2013/प्रक्र.162/जल-8, दि.10/03/2015 अन्वये सर्वसमावेशक नविन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.