ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या दि.31.05.2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये मृद व जलसंधारण आयुक्तालय, औरंगाबाद येथे सुरु करण्यात आले. सदर शासन निर्णयान्वये आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांना विभागप्रमुख म्हणून विभाग प्रमुखाचे सर्व प्रशासकीय व वित्तीय अधिकार तसेच गट-क व गट-ड या पदांचे नियुक्ती व शिस्तभंगविषयक अधिकार व गट-अ व गट-ब च्या अधिकाऱ्यांना किरकोळ शिक्षा देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
- दि.11.10.2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांना विभागाच्या अधिपत्याखालील गट-ब (अराजपत्रित), गट-क आणि गट-ड मधील पदांवर सरळसेवेने, पदोन्नतीने वा प्रतिनियुक्तीने करावयाच्या नेमणूका / पदस्थापनेच्या प्रकरणांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी नियुक्ती प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.