मातीचे नाला बांध

मातीच्या नाला बांधाची कामे राज्यांत 1969 पासून सुरु करण्यांत आली सुरवातीला ही कामे अवर्षण प्रवण क्षेत्रापुरती मर्यादित होती. नंतरच्या कालावधीत भूपृष्ठाखालील पाण्याच्या पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने या कामाची व्याप्ती वाढून राज्याच्या सर्व जिल्हयांत ही कामे हाती घेण्यांत येत आहे. या कामासाठी जागा निवडीची मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे आहेत.

(१) नाल्याच्या तळाचा उतार 3 टक्केपेक्षा जास्त नसावा
(२) नाल्याचे पाणलोट क्षेत्र कमीत कमी 40 हे. व जास्तीत जास्त 500 हे. असावे
(३) नाल्याची रुंदी 5 मी. पेक्षा कमी व 15 मी. पेक्षा जास्त असू नये.
(४) अतिरिक्त जादा पाणी बाहेर काढून देण्यासाठी नाल्याच्या बाजूला कठीण मुरुम असावा.
मातीच्या बांधामध्ये सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त 4 मी. उंचीचा पाणीसाठा केला जातो. मातीच्या नालाबांधामुळे भूगर्भातील पाणीसाठयात वाढ होऊन जवळपासच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते असे मूल्यमापन अहवालावरुन दिसून आले आहे.