पूर्वीचे नाव एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP)
केंद्र शासनाच्या सर्व विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांसाठी सामाईक मार्गदर्शक सुचना २००८ (सुधारित २०११) अन्वये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सन २००९-१० पासून राज्यात कार्यान्वित करण्यात आला आहे. सन २०१५-१६ पासून सदर योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास) मध्ये समाविष्ट करण्यात आली असून या योजने करीता केंद्र व राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण ६०:४० करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत मृद व जलसंधारण कामांबरोबर मत्ता नसलेल्या व्यक्तीना उपजीविका तसेच शेतकऱ्यांसाठी सुक्ष्म उद्योजकता व उत्पादन पध्दतीवर आधारित उपजिविका उपक्रम, प्रशिक्षण व संस्था बांधणी, प्रेरक प्रवेश उपक्रम, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, संनियंत्रण व मूल्यमापन इ. घटकांसाठी आणि प्रकल्प अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्चाची तरतूद केली आहे.
सदर योजनेंतर्गत सन २००९-२०१० ते सन २०२१-२०२२ या योजना कालावधीमध्ये रक्कम रु. ३११६ कोटी प्रागतीक खर्च झाला आहे.
सदर योजना ३1 मार्च २०२२ रोजी केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे संपुष्टात आली आहे.