सिमेंट नाला बांध

पाणलोट आधारित नाला उपचारामध्ये सिमेंट नाला बांध उपचारास अनन्य साधारण महत्व आहे. ज्या ठिकाणी मातीचे नाला बांध घेण्यासाठी तांत्रिक दृष्टया योग्य जागा उपलब्ध नाही अशा ठिकाणी सिमेंटचे नाला बांध बांधून पाणीसाठा केला जातो. यामुळे भूपृष्ठामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होवून नाल्यालगतच्या विहीरींच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होत असते. पर्यायाने विहीरीखालील बागायती क्षेत्रामध्ये वाढ होते.या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून महाराष्ट्र शासनाने सन 2011-12 पासून राज्यातील टंचाईग्रस्त जिल्हयांमध्ये पाणलोट आधारित उपचाराबरोबरच एकेरी पध्दतीने सिमेंट नालाबांधाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. यासंदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना शासन निर्णय दिनांक 23 मार्च, 2017 व 08 ऑगस्ट, 2018 अन्वये निर्गमित केल्या आहेत.