प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - पाणलोट विकास

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0

महाराष्ट्र राज्यासाठी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना - पाणलोट विकास घटक 2.0 या केंद्र शासनाच्या नवीन योजनेच्या अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाकडून मागदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. या आर्थिक वर्षाकरिता एकूण अंमलबजावणी उपचार क्षेत्र 5,65,186 हेक्टर इतके आहे. या योजनेंतर्गत एकूण 30 जिल्हे समाविष्ट असून एकूण प्रकल्प संख्या 144 इतकी आहे. या प्रकल्पाकरिता रु.1,33,556.59 लाख इतक्या निधीचे विनियोजन करण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत मृदेची धुप कमी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे