साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध कार्यक्रम

सिमेंट बांध बांधण्याचा कार्यक्रम

राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत सन 2011-12 मध्ये राज्यात कमी पाऊस असल्याने 63 तालुक्यांमध्ये सिमेंट नालाबांध बांधण्याचा कार्यक्रम राबविणयात आला आहे. त्याकरीता रा.कृ.वि. योजनेतून रू.25.00 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेतून 583 सिमेंट नालाबांध बांधण्यात आले आहेत. सन 2012-13 मध्ये दि.20 सप्टेंबर ,2012 चे शासन निर्णयानुसार राज्यातील 1--जिल्हयांतील 62 तालुक्यांमध्ये उपरोक्त काय्रक्रमासाठी रू.25.00 कोटी इतका निधी राष्ट्रीय कृषि विकास योजनेमधून उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत 361 सिमेंट नालाबांध बांधण्यात आले आहेत. राज्यातील पाण्याची उपलब्धता व वारंवार येणारी दुष्काळ सदृश परिस्थिती विचारात घेता राज्यातील टंचाई सदृश परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने भूगर्भातील पाण्याची पातळी 2 मीटर पेक्षा जास्त खाली गेलेल्या 15 तालुक्यांत सिमेंट नाला बांध बांधण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने या कार्यक्रमासाठी रू.150.00 कोटी इतका निधी शासनस्तरावरून उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली व सदरचा कार्यकम मृद संधारण विभाग व लघूसिंचन विभागामार्फत राबविण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत 1450 नाला बांध बांधण्यात आले आहेत. पूर्ण झालेल्या सिमेंट नाला बंधा-यांचा लोकार्पन सोहळा दि.9 जून 2013 रोजी राज्यात एकाच दिवशी संपन्न झाला. सन 2013-14 मध्ये सिमेंट नाला बांध बांधणे कार्यक्रमासाठी रू.587.85 कोटी निधी उपलब्ध झालेला असुन सदर निधीतून लघूसिंचन विभाग व मृद संधारण विभागामार्फत साखळी पध्दतीने सिमेंट नाला बांधाची कामे करण्यात आली आहेत.सन 2014-15 करीता सिमेंट नाला बांध बांधणे कार्यक्रमासाठी रू.285.9982 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सन 2017-18 पासून या योजनेंतर्गत सर्व अर्थसंकल्पिय तरतूद लघुसिंचन जलसंधारण विभागास उपलब्ध करुन दिली जाते.

सिमेंट नाला बांध बांधण्याचा कार्यक्रम सन 2015-16 साठी रू.400.00 कोटी निधी अर्थसंकल्पीत करण्यात आलेला आहे. रू 397.77 कोटी निधी शासनाने उपलब्ध केलेला असुन या पैकी रू.376.82 कोटी निधी लघूसिंचन विभागास व रू. 6.73 कोटी निधी कृषि विभागास वितरीत केलेला आहे. सन 2016-17 मध्ये रू.400.00 कोटी निधी अर्थसंकल्पीत करण्यात आलेला असुन, रू.131.70 कोटी निधी शासनाने उपलब्ध केलेला आहे. या पैकी रू.2.5366 कोटी निधी कृषि विभागास व रू.129.17 कोटी निधी लघुसिंचन विभागास वितरीत केलेला आहे. सन 2017-18 मध्ये 135 कोटी तरतूद अर्थसंकल्पित केली होती व त्यापैकी सर्व तरतूद वितरित केली होती त्यापैकी 130.12 कोटी खर्च झाला आहे. सन 2018-19 मध्ये रु.80 कोटी तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली होती. सदर सर्व तरतूद वितरित करण्यात आली असून त्यापैकी रु.74.42 कोटी खर्च झालेला आहे. सन 201९-20 मध्ये रु.60.00 कोटी तरतूद अर्थसंकल्पीत केली होती त्यापैकी खर्च रु.3445.83 लक्ष झाला आहे. व सन 2020-21 मध्ये रु.११०.०० कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती व सन २०२१-२२ मध्ये 110.00 कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे