पाणलोट क्षेत्र योग्य ठिकाणी धानाच्या जमिनीची बांधबंदिस्ती व मजगीची कामे करणे

ही योजना 1959 पासून सुरु झाली महाराष्ट्राच्या पश्चिम घाट भागात व विदर्भामध्ये जास्त पावसाच्या क्षेत्रात विशेषत: 4-8 टक्के जमिनीच्या उतारावर 10 ते 20 मी. अंतरावर छोटी खाचरे निम्म्या भागांत खोदाई व निम्या भागांत भराई करुन केली जातात या खाचरामध्ये पावसाचे पाणी अडविण्यासाठी बांध घातला जातो. व जादा पाणी सांडीव्दारे सोडून देण्यांत येते. या कामासाठी सर्वसाधारणपणे हेक्टरी खर्च जास्त येतो परंतू नापीकक्षेत्र हे पिकाखाली आणण्यांत येत असल्यामुळे भाताच्या उत्पादनामध्ये वाढ होते ज्या भागांत धानाची बांधबंदिस्ती व भातखाचरे केली जातात तो भाग अत्यंत कमी उत्पादनाचा असल्यामुळे शेतक-यांना उत्पन्नाचे भातशेती हे साधन असल्यामुळे ही योजना अत्यंत परिणामकारक ठरली आहे