सलग समतल चर
राज्यातील पडीक जमीन विकास कार्यक्रमातंर्गत बिगर शेतीखालच्या जमिनीत मातीसारख्या अमूल्य अशा विकास माध्यमाचे सरंक्षण करणे मृद व जलसंधारण करणे तसेच वृक्ष व चारा यांचे माध्यमातून स्थानिक लोकांच्या गरजा भागविणे व पर्यावरण संतुलन करणे हा सर्वसाधारण हेतू आहे. कमीत कमी खर्चात मृद व जलसंधारण करण्यासाठी सलग समपातळी चर घेऊन वृक्ष लागवड करावयाची आहे. या कामासाठी जमिनीचा उतार व पर्जन्यमान विचारात घेऊन राज्यांत पडीक जमीन विकासासाठी निरनिराळे आठ नमुने तयार करण्यांत आले असून त्याप्रमाणे कामे करण्यात येत आहेत