प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - पाणलोट विकास घटक २.०

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.०

केंद्रीय भूसंसाधन विभाग, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - पाणलोट विकास घटक २.० ही योजना राज्यात राबविण्यासाठी दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी मार्गदर्शक सूचनानुसार निर्गमित केल्या आहेत. या योजनेकरिता केंद्र व राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण ६०:४० आहे.

• सन २०२१-२०२२ पासून कार्यक्रम अंमलबजावणी सुरु.

• राज्याकरिता मंजूर प्रकल्पांचे उपचार क्षेत्र – ५,६५,१८६ हेक्टर.

• मंजूर प्राथमिक प्रकल्प अहवाल संख्या – १४४ (सुक्ष्म पाणलोट संख्या-१७६७).

• एकूण समाविष्ट जिल्हे – ३० (धुळे, सातारा, कोल्हापूर, नागपूर वगळून).

• एकूण समाविष्ट तालुके – १०२.

• एकूण समाविष्ट ग्रामपंचायती – १०३०.

• एकूण समाविष्ट गावे – १६०३.

• प्रकल्पमूल्य – रु.1३३५.५६ कोटी.