राज्यातील बहुतांशी कोरडवाहु क्षेत्रावर उपलब्ध जलस्रोताचा उपयोग केला तरी सुध्दा ६०% पेक्षा जास्त क्षेत्र पावसावरच अवलंबून राहणार आहे. त्यावर जलसंधारण हा एक उपाय आहे. जलसंधारणाचे महत्व ग्रामीण जनतेत पोहचावे आणि पाणलोट विकासाची कामे गतिमान पध्दतीने करण्यासाठी शासनाने राज्यात जाहिरात प्रसिध्दी आणि बक्षीसाच्या माध्यमातून पाणलोट विकास चळवळ कार्यक्रम कार्यान्वीत केला आहे. सन २०१६-१७ साठी महात्मा ज्योतिबा फुले जल मित्र पुरस्कार बक्षीस योजनेसाठी रु.५.०० कोटी निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. उर्वरित रु.५ कोटी नियतव्यय जुलै-२०१६ च्या अधिवेशनात अर्थसंकल्पित करुन घेण्यासाठी प्रस्तावित करण्यांत आले आहे. जाहिरात व प्रसिध्दीसाठी सन २०१६-१७ करीता रु.४.०० कोटी पाणलोट चळवळ कार्यक्रमासाठी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.