Padkai Program under Tribal Upyojana (High Slope Land : High Rainfall)

पडकई कार्यक्रम :

अनुसुचित जमातीतील लोकांच्या डोंगराळ व अतिदुर्गम व भागातील शेतजमिनीवर घेण्यात येतो. पडकई कार्यक्रमांतर्गत मजगी योजना राबविण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पडीक क्षेत्राची सुधारणा करुन क्षेत्र लागवडीखाली आणणे व भात पिकाखालील क्षेत्रात वाढ करुन भाताचे उत्पादन वाढविणे हा आहे. जमिनीचा ऊतार ८ ते २० टक्के व वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मि.मी पेक्षा जास्त असणारे क्षेत्र निवडण्यात येते.

सन २०१०-११ व सन २०१३-१४ पर्यंत पुणे जिल्हयातील आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यात रु.१४१० लक्ष खर्च होऊन ६६४.६१ हे. क्षेत्र सुधारीत करण्यात आले असून ६३३३ लाभार्थ्यांना लाभ झाला आहे. सन २०१३-१४ मध्ये अहमदनगर जिल्हयातील अकोला तालुक्यासाठी रु. १.०० कोटी निधीतून आदिवासी शेतकऱ्यांसाठी पडकई उपचाराचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे २४१ लाभार्थ्यांना फायदा झाल.

विशेष केंद्रीय सहाय्य निधीतून पडकई कार्यक्रमाकरीता सन २०१५-१६ मध्ये ६ आदिवासी जिल्हयांना रु.१९.०० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

सन २०१६-१७ पासून सदर योजना जिल्हा योजना म्हणून आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येत आहे.