अनघड दगडाचे बांध
ओघळीचे रुपांतर लहान नाल्यांत झाल्यानंतर त्यातून वहाणा-या पाण्याचा वेग व परिमाण जास्त होतो अशा ठिकाणी शेतातील दगड गोळा करुन त्याचा नाल्याच्या रुंदीएवढा बांध घालण्यांत येतो या बांधासाठी नाल्याच्या पात्रांत पाया खोदावा लागतो यामुळे दगडांना बळकटी येते. दगड रचताना ते पडू नयेत यासाठी बांधाला दोन्ही बाजूनी उतार देण्यांत येतो अशा दगडाच्या बांधाची संख्या, ओघळीची लांबी उतार व शेतपरिस्थितीप्रमाणे ठरविण्यात येते.