१.महामंडळाची स्थापना:
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाची स्थापना दि. २२ ऑगस्ट, २००० रोजी झालेली असून महामंडळाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे.
२. महामंडळाचा उद्देश:
महामंडळ स्थापनेचा मुख्य उद्देश राज्यातील ६०० हेक्टर पर्यंतच्या सिंचन क्षमतेचे लघु पाटबंधारे प्रकल्प, पाणलोट व मृदसंधारण आणि सामाजिक वनीकरण, इत्यादी कामांचे प्रचालन, प्रवर्तन आणि शीघ्र विकास व नियमन करणे हा आहे.
३. महामंडळाची रचना:
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम २००० चे कलम ४ (१) अन्वये महामंडळात खालील सदस्यांचा समावेश आहे.
१. |
मा. मंत्री, मृद व जलसंधारण |
पदसिध्द अध्यक्ष |
२. |
मा. राज्यमंत्री, मृद व जलसंधारण |
पदसिध्द उपाध्यक्ष |
३. |
मा. मंत्री, कृषि |
पदसिध्द सदस्य |
४. |
मा. मंत्री, जलसंपदा |
पदसिध्द सदस्य |
५. |
मा. प्रधान सचिव (वित्त) |
पदसिध्द सदस्य |
६. |
मा. प्रधान सचिव (नियोजन) |
पदसिध्द सदस्य |
७. |
मा. प्रधान सचिव (वने) |
पदसिध्द सदस्य |
८. |
मा. प्रधान सचिव (कृषि) |
पदसिध्द सदस्य |
९. |
मा. प्रधान सचिव (जलसंपदा) |
पदसिध्द सदस्य |
१०. |
मा. प्रधान सचिव (मृद व जलसंधारण) |
पदसिध्द सदस्य |
११. |
मा. सचिव (ग्रामविकास) |
पदसिध्द सदस्य |
१२. |
संचालक महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र , नागपूर |
पदसिध्द सदस्य |
१३. |
संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे. |
पदसिध्द सदस्य |
१४. |
व्यवस्थापकीय संचालक |
सदस्य सचिव |
वरील सदस्यांव्यतिरिक्त दिनांक १०.०८.२०१८ रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५२ नुसार महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम २००० यात आणखी सुधारणा करुन
१) जलसंधारण व मृदसंधारण क्षेत्राची विशेष माहिती व प्रत्यक्ष अनुभव असलेला तसेच लोकसहभागातून हाती घेण्यात आलेल्या जलसंधारण कामांचा अनुभव असलेला राज्य शासनाने नामनिर्देशित करावयाचा एक सदस्य - उपाध्यक्ष असे आणखी एक उपाध्यक्ष पद वाढविण्यात आलेले आहे.
२) पाटबंधारे क्षेत्राची विशेष माहिती व प्रत्यक्ष अनुभव असलेले राज्य शासनाने नामनिर्देशित करावयाचे सदस्य एक ऐवजी दोन करण्यात आल्याने उपरोक्त सदस्यांच्या यादीमधील क्रमांक नऊ येथील एकूण सदस्य संख्या तीन करण्यात आली आहे.
(अधिनियमाची प्रत वित्तीय तक्ते व शासन निर्णय विवरणपत्रांमध्ये ठेवण्यात आली आहे.)
४. कार्यकारी समिती :
अधिनियमातील कलम ५ व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ सुधारणा अधिनियम २००१ (क २०) अनुसार महामंडळाच्या कार्यकारी समितीत खालील सदस्यांचा समावेश आहे : -
१. |
मा. मंत्री, मृद व जलसंधारण |
पदसिध्द अध्यक्ष |
२. |
मा. राज्यमंत्री, मृद व जलसंधारण |
पदसिध्द उपाध्यक्ष |
३. |
अपर आयुक्त, जलसंधारण तथा मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण, प्रादेशिक क्षेत्र पुणे |
पदसिध्द सदस्य |
४. |
संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे |
पदसिध्द सदस्य |
५. |
प्रधान मुख्य वनसंरक्षक व महासंचालक, सामाजिक वनिकरण,पुणे |
पदसिध्द सदस्य |
६. |
मुख्य लेखा व लेखा परीक्षा अधिकारी, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ,औरंगाबाद |
पदसिध्द सदस्य |
७. |
व्यवस्थापकीय संचालक |
सदस्य सचिव |
असे एकूण ७ सदस्य आहेत
५. लेखा विषयक धोरण :
महामंडळाने रोख लेखा पध्दतीची प्रणाली अवलंबली आहे. महामंडळामार्फत केली जाणारी कामे ही महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका व संहिता तसेच मृद व जलसंधारण विभागाने निर्देशित केल्यानुसार आणि जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार केली जातात.