पदभरती संदर्भात महत्त्वाची सूचना

संक्षिप्त माहिती लिंक
मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) संवर्गातील 670 पदे भरण्याबाबत. क्लिक करा
मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) पदांची परीक्षा रद्द करण्यात आल्याबद्दल महत्वाची सूचना क्लिक करा
पदभरती संदर्भात महत्त्वाची सूचना - 18/02/2024 क्लिक करा
Precautions taken for Transparency in an Examination क्लिक करा
जलसंधारण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) या पदासाठीच्या परिक्षेबाबत महत्त्वाची सूचना. क्लिक करा
पदभरती संदर्भात महत्त्वाची सूचना क्लिक करा
मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील पदभरतीची जाहिरात व अभ्यासक्रम. क्लिक करा
मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांनी करावयाच्या अर्जाची लिंक. क्लिक करा

मान्यवर

गणेश पाटील
गणेश पाटील
सचिव, मृद व जलसंधारण विभाग
महाराष्ट्र राज्य
मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य

मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य

लोकसहभावर आधारित, तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने दिनांक 5 जून, 1992 रोजी जलसंधारण विभागाची स्थापना केली. या विभागाकडे जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट विकास लघु सिंचन, पडीक जमीन विकास यासारख्या महत्वपूर्ण केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचे संनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक ही केंद्र पुरस्कृत योजना, तसेच आदर्श गाव योजना या महत्वपूर्ण राज्य शासन पुरस्कृत योजनांचे संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यात येते.

विभागामार्फत सन 1995 पासून सुरू झालेल्या अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम, आश्वासित रोजगार योजना आणि एकात्मिक पडीक जमीन विकास कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमामध्ये लोक सहभागावर आधारित पाणलोट विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले असून त्यांच्या अंमलबजावणीमध्ये स्वयंसेवी संस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. माहे नोव्हेंबर,2000 पासून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात सुध्दा लोकसहभाग आधारित व्यवस्थापनाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात लघु सिंचन प्रकल्प यासह पाणलोट व जलसंधारण कामाचे प्रचलन आणि शीघ्र विकास आणि नियमन करण्यासाठी व त्यांच्याशी संबंधित बाबींकरिता विशेष तरतूद करण्यासाठी दिनांक 22 ऑगस्ट, 2000 रोजी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाची स्थापना करण्यात आली असून त्याचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.

जिओ पोर्टल

महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे वेब पोर्टल! जिओ पोर्टलच्या माध्यमातून GIS-आधारित नकाशाद्वारे राज्यभरात केलेल्या उल्लेखनीय मृद व जलसंधारणाची कामे बघता येतील. राज्यातील मृद व जल विषयक नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी काळजीपूर्वक संकल्पित केलेले पाझर तलाव,माजी मालगुजारी तलाव,साठवण तलाव,बंधारे, चेक डॅम, CNB पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प आणि इतर मृद जलसंधारण संरचना यात सामील करण्यात आलेले आहेत.

अद्यावत जीआयएस तंत्रज्ञांच्या सहाय्याने जिओ पोर्टलमुळे आमच्या उपक्रमांच्या अवकाशीय वितरणांबाबत अमूल्य माहिती प्राप्त होऊन त्यांच्या उपयुक्ततेची कल्पना येऊ शकते. संधारणाच्या या उपायोजनांची योजनाबद्ध आखणी तसेच सातत्यपूर्ण शेती, पर्यावरणाचा समतोल व समाजाच्या एकंदरीत कल्याणामधील त्याचे योगदान अनुभवण्यासाठी नकाशाद्वारे अन्वेषण करा. प्रगत GIS तंत्रज्ञानाद्वारे, आमचे जिओ पोर्टल मृद व जलसंधारणाची कामे प्रदर्शित करीत आहे.आता जिओ पोर्टलला भेट द्या.(अद्ययावत करणे सुरू आहे.)

फोटो गॅलरी