गॅबीयन बंधारा
दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. पाणलोटात पडलेले पावसाचे पाणी हे जे अपधावेच्या स्वरुपात वाहून जाते ते योग्य उपचाराव्दारे जागोजागी अडविणे व जिरविणे महत्वाचे आहे. परंतू काही भागांत सांडव्यासाठी योग्य जागा मिळत नसल्यामुळे मातीचे बांध घालणे शक्य होत नाही. तर पक्का पाया मिळत नाही म्हणून सिमेंट बांध बांधता येत नाही अशा भागासाठी गॅबीयन स्ट्रक्चरचे बांधकाम सोपे व कमी खर्चाचे आहे. यामुळे अपधावेचा वेग कमी होऊन जमिनीची धूप थांबविण्यास भूगर्भात पाणी मुरण्यांस मदत होते. गॅबीयन स्ट्रक्चर म्हणजे अनघड दगडाच्या जाळीच्या गुंडाळयांत नाला पात्रात घातलेला आडवा बांध होय. ही कामे 1992 मध्ये राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत सुरु करण्यांत आली. परंतु सदर कामाची उपयुक्तता विचारात घेऊन सदरची कामे इतर पाणलोट उपचाराप्रमाणे तांत्रिक दृष्टया योग्य जागेची निवड करुन जलसंधारणाचा या नियमित उपचार म्हणून राबविण्यांस शासनाने आता मान्यता दिलेली आहे.