Land Development through Soil Conservation Measures Integrated (Dynamic) Watershed Development Programme

अपूर्ण पाणलोटांची कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग, क्रमांक आदर्श-२००७/प्र.क्र.१२१/जल-७ दि. ३०.११.२००७ अन्वये राज्यातील ३५३ तालुक्यात प्रत्येकी किमान १ याप्रमाणे ३५३ पाणलोट सन २००७-०८ मध्ये विकसीत करण्यासाठी गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम राबविणेचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम धडक मोहिमे अंतर्गत गतिमान पद्धतीने राबविण्यात येणार असल्यामुळे या मोहिमे अंतर्गत विकसित होणारे पाणलोट राज्यात पथदर्शक पाणलोट ठरतील व त्यासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग मिळविण्यात येत आहे.