शेततळे
शेताच्या खोलगट भागात वेगवेगळया आकारमानाचे शेततळे घेण्यात येतात. शेततळयाचा उपयोग पाण्याचा तात्पुरता निचरा होणेसाठी पावसाचा ताण पडल्यास पिकांना सरंक्षित पाणी देण्यासाठी तसेच भूगर्भातील पाणी साठयांत वाढ करणेसाठी होतो. मृद संधारणाच्या व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाच्या नियमित कार्यक्रमा बरोबरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निधीतून ग्रामपंचायत व कृषि विभागामार्फत शेततळे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.