योजनेचा उद्देश :
-
पाणलोट क्षेत्र विकासाच्या सर्वमान्य उद्दिष्टांसोबत पाणलोट विकासाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कृषि आधारीत स्वयंरोजगाराच्या संधीद्वारे समाज घटकांची आर्थिक उन्नती साधणे.
-
ग्रामसभेच्या मान्यतेने, लोक सहभागातून व त्यांच्या संमतीने स्थानिक परिस्थिती व नैसर्गिक उपलब्ध पायाभूत संसाधनांचा विचार करुन प्रकल्प नियोजन करणे. मृद व जलसंधारण (in Situ व ex Situ) या पध्दतीने कामासोबतच संसाधन आधारीत स्वयंरोजगाराचे दीर्घकालीन नियोजन करणे
-
पाणलोट विकास कार्यक्रमाबरोबरच पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी, भूमिहिन, शेतमजूर, महिला यांचेसाठी उदरनिर्वाहाची साधने निर्माण करण्यासाठी नियोजन व त्याची अंमलबजावणी करणे.
-
पाण्याच्या ताळेबंदाविषयी जनजागृती व सक्षमतेने पाणी वापर या संदर्भात प्रबोधन करणे.
-
दीर्घकालीन शाश्वत रोजगार निर्मितीवर भर देणे व कृषि आधारीत अर्थव्यवस्था बळकट करणे. तसेच वेगवेगळ्या शेती पध्दती उदा. कृषि व पशुधन विकास, कृषि व फलोत्पादन विकास, कृषि व दुग्ध व्यवसाय इ. ची अंमलबजावणी करणे.
- दीर्घकालीन शाश्वत देखभाल दुरुस्ती कायमस्वरुपी सहभागी पध्दतीने करण्यासाठी पाणलोट देखभाल निधी उभारणे.
योजनेची व्याप्ती :
-
योजनेची सुरुवात सन २००९-१० पासून दिनांक १२ नोव्हेंबर, २००९; १४ डिसेंबर, २००९ व २८ जानेवारी,२०१० च्या शासन निर्णयान्वये आरआयडीएफ अंतर्गत ६८ मेगा पाणलोटांना (२६० क्लस्टर विकसीत करण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने या कार्यक्रमाची व्याप्ती कमी करुन शासन निर्णय दि. १२ मे, २०१४ अन्वये १४ मेगा पाणलोट ४३ समूह (Cluster) या योजनेतून अंतिमत: विकसित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
-
RIDF-१६ अंतर्गत एकूण २५-प्रकल्प व RIDF-१९ अंतर्गत प्रकल्पांना नाबार्डने मान्यता दिली आहे. या ३२ प्रकल्पांचे प्रकल्पमुल्य रु.१७१.३७ कोटी आहे.
-
सन २०१५-१६ करिता रुपये १३१७.०० लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून तो खर्च झाला आहे.
-
या कार्यक्रमासाठी सन २०१६-१७ या वित्तीय वर्षाकरीता रक्कम रु. २५.०० कोटी
-
अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.
-
आतापर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी रु.८८.०२ कोटी.
- आतापर्यंत झालेला खर्च रु.६६.४८ कोटी.
संनियंत्रण व मूल्यमापन (कृषि) :
• योजनांचे संगणकीय संनियंत्रण व मूल्यमापन करणेसाठी रू.१.०० कोटी नियतव्यय सन२०१५-१६ मध्ये रु.०.७० कोटी एवढा निधी अर्थसंकल्पित झाला आहे. त्यापैकी रक्कम रू.७.८९ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे. सन २०१६-१७ साठी रु.१.०० कोटी निधी अर्थसंकल्पित करण्यांत आला आहे.